ताज्या घडामोडी

*साठवलेल्या पैशातून शिवभोजन योजनेला देणगी देत हर्षवर्धन याने वाढदिवस साजरा केला*

शेअर करा

साठवलेल्या पैशातून शिवभोजन योजनेला देणगी देत हर्षवर्धन याने वाढदिवस साजरा केला

कडा दि 26,टीम सीएमन्यूज

येथील सहावीत शिकणाऱ्या हर्षवर्धन राऊत याने गल्ल्यात साठवलेल्या पैशातून शिवभोजन योजनेला देणगी देत आपला वाढदिवस साजरा केला.
कडा येथे शिवभोजन योजनेतून गरीब आणि गरजू व्यक्तींना पाच रुपयात जेवण दिले जाते . कड्यातील पत्रकारांनी हे पाच रुपये देखील देण्याची गरज पडू नये यासाठी पहिल्या दिवसाचा खर्च उचलला होता . त्याचे अनुकरण करत अनेक दानशूर व्यक्ती यात सहभागी झाल्या . त्यामुळे आता या केंद्रातील भोजनाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना मोफत भोजन मिळते . रविवारी ( दि २६ एप्रिल ) हर्षवर्धन राऊत याचा वाढदिवस होता . त्याने आपल्या गल्लायत साठवलेली रक्कम शिवभोजनसाठी एक दिवसाचा खर्च म्हणून दिली . पत्रकारांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close