कड्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव !
कड्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव !

आष्टी 
गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण नसलेल्या आष्टी तालुक्यात पुन्हा कोरोना बाधित येण्यास सुरुवात झाली आहे.आज अहवालानुसार कडा येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे दिसत होते.पण कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे.
आष्टी तालुक्यात अनेक गावांत छुपे कोरोना बाधित आहेत.काही रुग्ण घरीच उपचार घेत आहेत तर काही नगर येथे उपचार घेत असल्याने प्रशासनाकडे याची नोंद होताना दिसत नाही .पर्यायाने याची माहिती अधिकृत पणे पुढे येताना दिसत नाही.

आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील मेडिकल परिसर , सिटी पोलीस ठाणे येथे कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आलेल्या अहवालात अंबाजोगाई 9,आष्टी कडा 1,बीड 8 केज 2, माजलगाव 3, परळी 8,पाटोदा 3 शिरूर 5 इतके बाधित आले आहेत.

Share this story