आष्टी तालुक्यात पुन्हा बिबट्या; पाऊलखुणा सापडल्या!
बिबट्या

आष्टी-प्रतिनिधी 

बिबट्या चा थरार पाहिलेल्या आष्टी तालुक्याला पुन्हा एकदा बिबट्या ने दर्शन दिल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झालं आहे.

निमगाव चोभा येथील शिवारात कडा- पैठण बारामती रोडलगत असलेल्या धस वस्तीवर उसाच्या शेतात रविवारी दुपारी चार ते पाच दरम्यान शेतकर्‍याला बिबट्याचे अचानक दर्शन झाले.त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्या


 वनविभागाने कर्मचारी सोमवारी सायंकाळी उशिरा जाऊन पाहणी केली असता तो बिबट्या  असल्याची माहिती पाऊलखुणावरून निष्पन्न झाले आहे. त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी सरपंच विजय शेळके यांनी केली आहे.

    आष्टी तालुक्यात काही महिन्यापुर्वी नरभक्षक बिबट्याने धुमाकुळ घातला होता. याची मनातील भिती संपत नाही तोच आता परत चोभानिमगांव परिसरातील सोपान बापु थेटे या शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात रविवारी बिबट्याने अचानक दर्शन दिल्याने त्यानी जीव मुठीत धरून वस्तीकडे धाव घेतली आणि याची चर्चा होताच नागरिकांनी टोळक्याने पाहणी केली. पण कुठेच काही दिसुन आले नसल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी आष्टी येथील वनविभागाच्या लोकांना याची दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी वनविभाकडुन या ठिकाणी जाऊन पाऊल खुणाची पाहणी केली असता तो बिबट्याचाच असल्याचे निष्पन्न झाले असून  त्या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी माजी सरपंच विजय शेळके यांनी केली आहे. 

   चोभानिमगांव परिसरात वनविभाकडुन बिबट्या दिसलेल्या शेतात जाऊन पाऊल खुणाची पाहणी केली असुन तो बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी  सांगितले. 

  वनरक्षक बाबासाहेब शिंदे, अशोक काळे, एस.व्ही. शेटे वनमजुर देवराव कुमखाले, युनुस शेख यांनी जाऊन पाऊल खुणाची पाहणी केली. 

Share this story