पीक विमा प्रश्नांसाठी पुणे कृषीआयुक्त कार्यालयावर मोर्चा
Crop insurance ,पीक विमा

पुणे -प्रतिनिधी 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नांसाठी पुणे कृषी आयुक्त कार्यालयावर किसान सभेच्या वतीने दुपारी 12 वाजता
 मोर्चाचे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती किसान सभेचे डॉ अजित नवले यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .

 सन 2020 साली परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पीक विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई  द्यावी.

पीक विमा योजनेत शेतकरी हिताचे धोरणात्मक बदल करावेत.यासह इतर मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे.या मोर्चासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अशोक ढवळे ,जे. पी. गावीत,किसन गुजर ,अर्जुन आडे ,उमेश देशमुख ,ऍड. अजय बुरांडे,डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

Share this story