करुणा शर्मा यांच्या कडून परळी पोलिसात गुन्हा दाखल
करुणा शर्मा

परळी/ प्रतिनिधी 

शहरात रविवार दि 5 रोजी घडलेल्या नाट्यमयरित्या परिस्थितीवर कथित करुणा शर्मा(करुणा धनंजय मुंडे ) यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात 80 ते 100 व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

परळी शहर पोलीस ठाण्यात गुरनं.- 143/ 2021 कलम. 188, 143,504,506 भादवी नुसार फिर्यादी करुणा  धनंजय मुंडे (वय 42 वर्ष )व्यवसाय सामाजीक कार्यकर्ता रा.64 ग्रीन.पोद्दार शाळा सांताकुंज पश्चिम  मुंबई यांच्या फिर्यादीवरून परळी शहरातील अज्ञात 80 ते 100 महिला आणि  पुरुष यांच्या विरोधात रविवार दि 05 रोजी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा :परळी प्रकरणात करुणा शर्मा यांनी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी


 पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार फिर्यादीस अज्ञात 80 ते 100 महिला आणि पुरुष  आरोपीतांनी एकत्र येऊन  जीवे  मारण्याच्या धमक्या दिल्या. या  कारणाने परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास  पो.नी. सो. यांचे आदेशान्वये पोह 1771 चव्हाण यांचेकडे दिला आहे.


 

Share this story