मालकानेच चोरली ट्रक; विमा मिळविण्यासाठी बनावट चोरीची फिर्याद
 विमा

नगर- प्रतिनिधी

विमा कंपनीकडून विमा मिळावा यासाठी खुद्द मालकानेच आपली ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद श्रीरामपूर पोलिसांत दिली आणि स्वतः पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

श्रीरामपूर येथील वार्ड क्रमांक २ मधील रेहान आयुब शाह यांनी आपली ६ लाख रुपये किमतीची अशोक लेलंड कंपनीचा दहा टायरचा ट्रक क्रमांक mh 17 बीवाय-५५५९ हा सम्राट नगर सूतगिरणी श्रीरामपूर येथून चोरीला गेल्याची फिर्याद शाह यांनी दिली होती.यासंदर्भात गुन्हा दाखल  झाल्यानंतर तपास सुरु झाला.

 विमा

दरम्यान या बाबत तपास करताना या मध्ये फिर्यादी आणि त्याच्या साथीदाराने वाहन विमा चे पैसे मिळविण्यासाठी हा गुन्हा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने तपास करून फिर्यादीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा गुन्हा त्याचे मित्र इत्तू शेख आणि पप्पू गोरे यांच्या मदतीने केला असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी इफ्तेकार उर्फ इत्तू इस्माईल शेख याच्या ताब्यातून ट्रक जप्त केला. तर प्रशांत उर्फ पप्पू दादासाहेब गोरे हा फरार झाला.

विमा कंपनीला फसवून विमा रक्कम हडप करण्याचा हा प्रकार पोलिसांमुळे उघडकीस आला आहे.

Share this story