*भाजपच्या नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य रमेश कराड सह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
*भाजपच्या नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य रमेश कराड सह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

 

परळी दि 21 मे टीम सीएमन्यूज

विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर आज नवनिर्वाचित सदस्य रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन घेतले दरम्यान त्यांनी सामजिक अंतराच्या नियमाचा भंग केला आणि जमाव बंदीचा उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यासह 22 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिस नाईक विष्णु घुगे यांच्या फिर्यादीवरून
विधानपरिषदेचे नवनिर्वाचीत आमदार रमेश कराड हे आज गोपिनाथ गडावर आले असताना या साथरोगकाळात त्यांनी सामाजीक अंतराचा भंग व जमावबंदी आदेशाचे उल्लघन केल्या प्रकरणी त्यांच्यासह इतर 22 जणा विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आ.रमेश कराड यांनी गोपिनाथ गड पागरी ता.परळी येथे येत असताना पोलिस प्रशासनाला कोणतीही कल्पना दिली नाही आणि दर्शनास आले यावेळी त्यांनी लोकजमा केले. म्हणून भाजप महिला आघाडीच्या डॉ.शालिनी कराड, बालासाहेब कराड, जिवराज ठाकणे, श्रीहरी मुंडे, दिनकर मुंडे, विठ्ठल मुंडे आदि लोक होते. कोरोना संसर्ग पसरेल ही भिती असताना ही जिल्हाधिकारी संचारबंदी आदेशाचे व प्रतिबंध्दक नियमाचे उल्लघंन केले म्हणुन पोलिस नाईक घुगे यांच्या फिर्यादीवरून कलम 143,188,269,270,271,भा.द.वी सह कलम 15 नुसार गुन्हा नोद करण्यात आला.

Share this story