*घेऊन गेला दूध आणले डिझेल…*
*घेऊन गेला दूध आणले डिझेल…*

 

केज दि,3 मे टीम सी एम न्युज

कळंब येथील दूध डेअरी वर दूध घालून परतणाऱ्या छोटा हत्ती या वाहनाची चेक नाक्यावर पोलिसांनी तपासणी केली असता त्या मध्ये चार बॅरेल मध्ये डिझेल आणल्याचे दिसून आणल्याने पोलिसांनी वाहनासह एकूण 224510 रुपयाचा मुदेमाल जप्त करत वाहन चालकां विरूद्ध केेज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील काळेगाव येथील सलिम मुस्ताफा शेख हा कळंब येथील कळंब येथील दुध डेअरीमध्ये 30 कॅन दुध डीलीवरी देवुन परत गावाकडे येत असलेल्या छोटा हत्ती क्रमांक एम.एच.14 जी. यु.6931या वाहनाची बोरी सावरगाव फाट्या वरील चेक नाक्यावर पोलिस उपनिरीक्षक अर्चना भोसले, महिला पोलिस नाईक रुक्मिणी पाचपिंडे, जोगदंड, करवंदे यांनी तपासणी केली असता तीस दुधाचे कॅन, व निळया रंगाचे चार बॅरेल मध्ये एकूण 130 लिटर डिझेल मानवी जिवन धोक्यात येइल,किंवा दुखापत किंवा नुकसान पोहचण्याचा संभव होइल हे माहीत असतानाही हयगयीने ज्वालाग्राही पदार्थ डिझेल स्वताचे
ताब्यात बाळगुन व त्याची वाहतुक करताना मिळुन आल्याने एकूण 224510 रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी केज पोलिसात पोलिस उपनरीक्षक अर्चना भोसले यांच्या तक्रारीवरून चालक सलिम मुस्ताफा शेख रा काळेगाव ता केज जि बीड याचेविरुध्द भादंवि कलम 188,269,270,285 सह
कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन अधि.2005 सह कलम 17 महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this story