*तिहेरी हत्याकांडातील मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार; पोलीस अधिक्षकांचे केज मध्ये ठाण*
*तिहेरी हत्याकांडातील मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार; पोलीस अधिक्षकांचे केज मध्ये ठाण*

केज दि 14 मे टीम ,सी एम न्यूज

केज तालुक्यातील मांगवडगाव येथे झालेल्या तिहेरी हत्याकांड मृतदेहाचे पोस्टमार्टेम अंबेजोगाई येथील हॉस्पिटलमध्ये करण्यात यावे आणि या मृतदेहाची अंतिम संस्कार मांगवडगाव येथील शेतामध्ये करण्यात यावे अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.तरच आपण हे मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने पोलीस यंत्रणेने समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेही येथे ठाण मांडून आहेत.

13 मे रोजी रात्री उशिरा निंबाळकर आणि पवार या दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन तिहेरी हत्याकांडात झाले. यामध्ये या शेतातच एकाच कुटुंबातील असलेल्या तिघांचा खून करण्यात आला.बाबू पवार, प्रकाश पवार आणि संजय पवार असं मयत व्यक्तींचे नावं आहेत.
या तिघांचे मृतदेह केज येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. मात्र या मृतदेहाची उत्तरीय तपासणी आंबेजोगाई येथे आमच्यासमोर करण्यात यावी तसेच या मृतदेहाचे अंत्यसंस्कार मांगवडगाव येथील शेतात करण्यात यावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली. असून तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी सांगितले की,केज तालुक्यातील मांगवडगाव येथे 15 एकर शेतीच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून निंबाळकर आणि पवार या दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. याच जमिनीच्या संदर्भात 2006मध्ये युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात दिवाणी न्यायालयांमध्ये वाद सुरू होता. मात्र मृतांच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार या शेतीच्या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल पवार यांच्या बाजूने लागला असून ही जमीन ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. 7 महिन्यांपूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती .याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत संशयित म्हणून 17 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृतांचे पोस्टमार्टेम झाले असून केज च्या रुग्णालयाला मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस ,केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, युसूफ वडगावचे सपोनि. आंनद झोटे आदी पोलीस कर्मचारी परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत .

Share this story