*पाथर्डीत 23 कोरोना बाधित;पोलीस ठाण्यातील एक कर्मचाऱ्यासह एक आरोपी बाधित*
*पाथर्डीत 23 कोरोना बाधित;पोलीस ठाण्यातील एक कर्मचाऱ्यासह एक आरोपी बाधित*

 

पाथर्डी दि 19 प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात केलेल्या अँटीजन टेस्ट मध्ये तालुक्यातील 23 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तर दिलासादायक म्हणजे 15 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये पाथर्डी पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी आणि एका आरोपीचा समावेश आहे.

दि 19 ऑगस्ट बुधवार रोजी शहर व तालुक्यातील 17 व्यक्ती पाथर्डीच्या कोविड सेंटरच्या तपासणीत कोरोनाने बाधित झालेले आढळून आले आहे.तर खाजगी व जिल्हा रुग्णालय येथील प्रयोगशाळेतील तपासणीत 6 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.असे 23 जण कोरोनाने बाधित झाले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,कोविड सेंटरचे प्रमुख डॉ महेंद्र बांगर यांच्या पथकाने 53 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली.त्यात कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

वाचा:उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरु होणार-परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब यांची माहिती

पाथर्डी शहर 02,पाथर्डी पोलीस स्टेशन 02,कासार गल्ली 01,वामानभाऊ नगर 01,माळी बाभूळगाव 01,तिसगाव 04,चिंचोडी 02,मिरी 03,करोडी 01,टाकळी मानूर 02,मिडसांगवी 04, या भागातील रुग्ण आढळून आले.

Share this story