*बीड जिल्ह्यात 4 नवीन कोरोना बाधितांची भर,कोरोना गावात पसरतोय*
*बीड जिल्ह्यात 4 नवीन कोरोना बाधितांची भर,कोरोना गावात पसरतोय*

 

बीड दि 21 मे टीम सीएम न्यूज

बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या वाढतेय .दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे .काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात चार नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे .हे सर्व गाव खेड्यातील असल्याने कोरोना आता गावात पसरत असल्याचे दिसत आहे .विशेष म्हणजे हे सर्व मुंबई हुन आलेले आहेत .अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली .

बीड जिल्ह्यातून लातूर येथे तपासणी साठी 113 स्वब पाठविण्यात आले होते .त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .यामध्ये वाहली ता. पाटोदा येथील 2 महिला असून त्यांची वय वय 60 आणि 27 अशी आहेत .तर पाटोदा येथे 73 वर्षीय एक जण आढळून आला असून वडवणी येथील 67 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे .

अधिक वाचा

जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत नगर शहरातील रिक्षाचालक तर संगमनेर येथील बाधीत रुग्णाच्या पत्नीला कोरोनाची लागण नगर@68https://cmnews.co.in/two-more-corona-infections-were-found-in-the-ahmedngar-district/

जिल्ह्यातील 90 व्यक्तींचे अहवाल नकारात्मक आले आहेत तर 19 अहवाल प्रलंबित आहेत .त्यांची आज प्रतीक्षा आहे .अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली .बीड जिल्ह्यात रुग्णांची संख्या 17 झाली असून त्यातील पिंपळा येथील रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे .

Share this story