*बीड जिल्ह्यात दिवसभरात 8 आणखी बाधितांची भर; बाधित रुग्णांची संख्या@55*
*बीड जिल्ह्यात दिवसभरात 8 आणखी बाधितांची भर; बाधित रुग्णांची संख्या@55*

 

बीड दि 26 मे टीम सीएमन्यूज

बीड जिल्ह्यात लॉक डाउन शिथिल झाल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे .आज आणखी 8 बाधितांची भर पडून संख्या 55 इतकी झाली आहे .अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .आज दुपारी दोन रुग्ण धानोरा रोड भागात आढळून आल्यानंतर पुन्हा सायंकाळी 6 नवीन रुग्णांची भर पडली त्यामुळे दिवसभरात 8 रुग्ण वाढले जिल्ह्यातील एकूण संख्या पन्नास च्या पुढे गेली आहे .
अधिक वाचा

*जिल्ह्यात आणखी दोन बाधितांची भर; बाधित रुग्णांची संख्या@४९**शहराची वाटचाल कंटेन्मेंट झोन कडे*    

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आणि बीड येथून दररोज नवीन कोरोना लक्षणे असणाऱ्या नागरिकांचे स्वब टेस्टिंग साठी पाठविले जात आहेत.त्यात पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण वाढत आहे .
बीड जिल्हयातील आज एकूण ३० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.त्यांचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला .त्यामध्ये 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.काल दिनांक 25 रोजी पाठविलेल्या स्वब पैकी दोन अहवाल आज पॉझिटिव्ह आले.त्यामुळे एकूण संख्या वाढली आहे .

आज वाढलेल्या सहा कोरोना बाधित रुग्ण हे हाळंब तालुका परळी येथील 2
बारगजवाडी तालुका शिरूर येथील 2
कारेगाव तालुका पाटोदा येथील 1 आणि
वाहली तालुका पाटोदा येथील एकाचा समावेश आहे . पाठविलेल्या अहवालात 22 अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर दोन अहवाल अजून प्रलंबित आहेत .अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .

Share this story