*स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ यांच्या यांच्या समाधीवर खासदार प्रीतम मुंडेंसह आ.सुरेश धस नतमस्तक*
*स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ यांच्या यांच्या समाधीवर खासदार प्रीतम मुंडेंसह आ.सुरेश धस नतमस्तक*

 

 

गोपिनाथ गड ,दि 3 जून /टीमसीएम न्यूज

आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिना निमित्त गोपीनाथ गडावर पोलिसांचा बंदोबस्त ठेऊन स्मृती दिन साजरा केला जात आहे . खासदार प्रितम मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन घेतले .

गोपीनाथ गडावर कडेकोट बंदोबस्त, सर्वसामान्यांना दर्शन नाही लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज 6वी पुण्यतिथी आहे. यंदा मात्र कोरोनामुळे गडावर येण्यास सर्वसामान्यांना मनाई करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो मुंडे समर्थक गडावर येण्याची शक्यता होती त्यातच कोरोना महामारी लक्षात घेऊन प्रशासनाने गडावर चोख बंदोबस्त ठेवला आहे. 6 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच गडावरील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे .

Share this story