*काहींनी मास्क लावून तर काहींनी बिगर मास्क,लुटले डिझेल*
*काहींनी मास्क लावून तर काहींनी बिगर मास्क,लुटले डिझेल*

 

करंजी ,दि 17 मे टीम सीएमन्यूज
करंजी घाटात डिझेलचा टँकर पलटी झाला,ही बातमी करंजी गावात पसरली ,अनेकांनी घाटात धाव घेतली आणि वाहणाऱ्या डिझेल मध्ये हात धुवून घेतले.
काहींनी मास्क लावलेले होते तर काही बिगर मास्कचे डिझेल आपल्या ड्रम, बाटल्या मध्ये भरत होते, येणारे जाणाऱ्या प्रवाश्यांना याचा मोह आवरला नाही त्यांनीही डिझेल गोळा केले.
तर रस्त्यावर सांडलेल्या डिझेलमुळे रस्त्यावरच घसरून आदळले.
नगर पाथर्डी रस्त्यावर करंजी घाटातील एका अवघड वळणावर डिझेलचा टँकर पलटी होऊन सुमारे 24 हजार लिटर डिझेल वाया गेले. यावेळी अनेक ग्रामस्थ व प्रवासी यांनी डिझेल लुटण्याचा आनंद घेतला. रविवारी सकाळी 11 वाजता मुंबई येथून डिझेल भरून जाणारा टँकर करंजी घाटात सव्वाअकरा वाजता पलटी झाला हा टँकर परभणी व वाशिम वसमत येथे डिझेल घेऊन चालला होता .अवघड वळणावर त्याला अपघात झाला त्यामुळे त्या वाहनाचे चालक बाबासाहेब राहणार पाटसरा तालुका आष्टी जिल्हा बीड हे जखमी झाले .पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकर उभा करण्यात आला.मात्र रस्त्यावर डिझेल सांडल्यानंतर अनेक दुचाकी स्वार घसरून पडले आहेत .

Share this story