*ना ना म्हणता आणखी एका बधिताची नगर शहरात भर@५४*
*ना ना म्हणता आणखी एका बधिताची नगर शहरात भर@५४*

 

 

अहमदनगर, दि.१२ मे टीम सीएमन्यूज

अहमदनगर शहर अनेक दिवसापासून कोरोना मुक्त होण्याकडे वाटचाल करत होते,जामखेड,संगमनेर हे हॉटस्पॉट होते आता नगर शहरातील सुभेदार गल्लीत कोरोना बाधित महिला आढळून आल्याने शहरापासून दूर असलेला कोरोना आता पुन्हा शहरात घुसला आहे .
नगर शहरातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ झाला आहे. या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
नगर शहरात गेल्या काही दिवसंपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज पुन्हा शहरातील सुभेदार गल्ली भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तात्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना करणे सुरू केले आहे.

Share this story