*बीड जिल्ह्यात कोरोनाचा corona उच्चांक;404 अंटीजेन मधील 228 चा समावेश*
*बीड जिल्ह्यात कोरोनाचा corona उच्चांक;404 अंटीजेन मधील 228 चा समावेश*

 

बीड दि. 15  सप्टेंबर, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना corona अहवालात कोरोना बाधितांचा उच्चांक झाला आहे. आज  404  रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये काल आलेल्या 228 अंटीजेन चाचण्यांचा समावेश आहे त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण  बीड 74 आहेत.

बीड जिल्ह्यातील दिनांक 14 सप्टेबर आणि 15 सप्टेबर अशा दोन दिवसाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने आज दिला आहे. कालच्या 228 कोरोना corona अंटीजेन चाचण्यामध्ये आलेल्या बाधितांचा समावेश 404 बाधितांमध्ये आहे.उर्वरित 176 आज बाधित झालेले आहेत.

आज बीड जिल्ह्यातील 6055 अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 5651 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 404 कोरोना corona बाधित आढळून आले आहेत.परळी 62 बीड 74 ,अंबाजोगाई 17 ,केज 27,माजलगाव 15, धारूर 43 ,पाटोदा 34 आष्टी 29 ,शिरूर 49 ,वडवणी 20 ,गेवराई 34 जणांचा समावेश आहे.

परळीतील स्टेट बँकेतील कर्मचारी कोरोना corona बाधित झाल्यानतर जिल्ह्यातील अनेक बँकेत कोरोना बाधित वाढत आहेत. आज स्टेट बँक ऑफ इंडिया वडवणी येथे दोन बँकेतील कर्मचारी बाधित झाले आहेत तर महाराष्ट्र ग्रामीण बँक पाटोदा एक कर्मचारी बाधित झाला आहे.

आष्टी तालुक्यातील 29  बाधितांमध्ये धामणगाव 06, पिंपरी घाटा 02 शेरी खुर्द 01,पिंपळा 01,उंदरखेल 01,टाकळसिंग 03,आष्टी भीमनगर 01,दारूगल्ली 02,इमनगाव 01 , जामगाव 03, लाटेवाडी 01 ,सुंदरनगर कडा 02, खुंटेफळ 01 ,सुर्डी 02,धानोरा 01 ,आणि दौलावडगाव 01 यांचा समावेश आहे.

प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कोरोना corona बाधितांना शोधून काढण्यासाठी अंटीजेन चाचण्या घेण्याचे ठरविले आहे.त्यातून हा आकडा पुढे येत असून कोरोना वर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

Share this story