*आष्टीत एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह*
*आष्टीत एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह*

 

आष्टी दि 22 मे टीम सीएमन्यूज

आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील मृत युवकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला ,त्यामुळे तालुक्याने सुस्कारा सोडला तर काही वेळात धनगरवाडी येथील एक कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.त्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे.ही व्यक्ती मुंबईवरून आलेली आहे.

 

बीड जिल्हा प्रशासनाने लातूर येथे पाठवलेल्या स्वब मध्ये आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील 19 वर्षे युवकाचा अहवाल हा नकारात्मक आला आहे. तर याच तालुक्यातील धनगरवाडी येथील मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आष्टी तालुक्यांमध्ये कोरोना घुसला असल्याचे चित्र दिसत आहे.

Share this story