ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांपैकी 10 बाधित, जम्बो कोरोना आकडा*

शेअर करा

बीड दि 9 प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे रात्री उशिरा आलेल्या आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.शिरूर कासार वगळता सर्व तालुक्यात बऱ्यापैकी कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे.

 

 

काल बीड शहरात अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये 86 जण बाधित आढळून आले आहेत .त्यासह जिल्हा रुग्णालयातील स्वब सह ही संख्या 104 झाली आहे .एकाच दिवसांत बीड मध्ये कोरोनाने शंभरी तर जिल्ह्याने द्विशतक म्हणजेच 203 चा आकडा ओलांडला आहे. बीड जिल्ह्याची कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 1584 एवढी झाली आहे. तर मृतांचा आकडा हा पन्नाशी च्या पुढे जाऊन तो 51 झाला आहे.

 

प्राप्त झालेल्या अहवालात ब बीड अँटीजन टेस्ट सह इतर 104, परळीत-32 , अंबाजोगाई-10,आष्टीत-10, धारूर – 2, केज-13, माजलगाव- 19, गेवराईत-6, पाटोदा- 2 , वडवणी-5 असे रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून आता पर्यंत गेवराई नंतर बीड शहरात अँटीजन टेस्ट घेण्यात येत आहे. बीड शहरात आज आणि उद्या ही सुरू असणार आहे.

अंबाजोगाई,आष्टी बीड

 

धारूर,गेवराई, केज आणि माजलगाव।

परळी पाटोदा आणि वडवणी।

 

 

 

 

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close