ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड:पाटोदा पोलीस ठाण्यातील 6,माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील4 सह 106 बाधित*

शेअर करा

बीड दि 28,प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 106 रुग्ण बाधित आढळून आले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण धारूर आणि माजलगाव येथील आहेत.बधितांमध्ये पाटोदा पोलीस ठाण्यातील 6 कर्मचारी,ग्रामीण रुग्णालय माजलगाव येथील 4 आणि अंबाजोगाई येथील स्वरातीच्या एका बधिताचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि धारूर येथे बाधितांची संख्या वाढली आहे.त्याखालोखाल बीड मधील आणि आज परळीचा आकडा खाली आला आहे.
पाटोदा येथे सहा बाधित आढळून आले असून हे पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहेत.माजलगाव येथे 19 जण बाधित आढळून आले असून त्यापैकी 4 जण हे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आहेत.अंबाजोगाई येथील 14 बाधित आढळून आले असून त्यापैकी एक स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील एकाचा समावेश आहे.

हेही वाचा:कसा आहे राज्यातील एकमेव ऐतिहासिक निद्रिस्त गणेश

धारूर तालुक्यात 19 बाधित झाले आहेत.बीड मध्ये 18,परळी 6, गेवराई 07,पाटोदा 06, शिरूर 02 ,वडवणी 01 आणि आष्टी तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील एक, धामणगाव येथील एक ,टाकळी अमिया येथील एक आणि हरिणारायन आष्टा येथील एक बाधित झाला आहे.

आज बीड जिल्ह्यातील 623अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 517 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 106 बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या-4373
अक्टिव्ह रुग्ण-1502
बरे होऊन गेलेल्यांची संख्या-2756
मृत्यू:115 अधिक इतर जिल्ह्यात मृत्यू झालेले रुग्ण.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close