ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*मंत्र्यांनी आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश-राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती…*

शेअर करा

 

 

मुंबई दि. १७ फेब्रुवारी । टीम सीएमन्यूज

येत्या वर्षात जिल्हा परिषदा आणि इतर निवडणूका येत असून त्या अनुषंगाने मंत्र्यांना सुचना करण्यात आल्या.शिवाय महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा निवडणूका लढवता येतील याबाबतही चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमचा व कॉंग्रेसचा जाहीरनामा आहे त्यामध्ये जे मुद्दे होते त्या मुद्द्यावरअंमलबजावणी करण्यासाठी ज्या मंत्र्याकडे कामे होती. त्यावर उपाययोजना करण्यात यावी यावरही चर्चा झाली. तर एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव बाबत जे पत्र दिले होते. त्याची बैठक झाल्यानंतर दोन तासाच्या आत NIA कडे केस वर्ग केली. कायदेशीररित्या ती केस त्यांना देणं बंधनकारक आहे. तो निर्णय झाला असला तरी सेक्शन – १० मध्ये तरतुद आहे की, समांतर चौकशी करण्याचा अधिकार हा राज्यसरकारकडे आहे. गृहमंत्र्यांनी याबाबतची प्रक्रिया पुर्ण करुन पवारसाहेबांना माहिती दिली. पवारसाहेबांचा जो आग्रह होता तो ते पुर्ण करतील असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

Npr हे डाटा कलेक्शन आहे ते आधारच्या माध्यमातून झालेले आहे. Npr म्हणजे जे सेन्सेस आहे त्यामध्ये अतिरिक्त प्रश्नावली केंद्रसरकारने टाकलेली आहे. त्याबाबतीत इतर राज्यांनी कोणती भूमिका घेतली आहे. त्याबाबतीत काही माहिती नाही मात्र आमच्या राज्यात तिन्ही पक्ष बसून कुठली प्रश्नावली टाकावयाची आहे याबाबत तिन्ही पक्ष निर्णय घेणार आहे. सेन्सेसचा कार्यक्रम ठरलेला आहे. त्याबाबतची तयारी झाली आहे मात्र प्रश्नावली अजून ठरलेली नाही. त्यावर तिन्ही पक्ष बसून निर्णय घेतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close