क्रीडा शिक्षण संकृतीमराठवाडाशैक्षणिक

*जि.प.कन्या प्रशाला आष्टीचे शिष्यवृत्ती परीक्षेत 12 विद्यार्थिनी पात्र*

शेअर करा

 

आष्टी : दि.१५ ,प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ९ आँक्टोबर रोजी जाहीर झाला.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८ वी मध्ये जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी,ता.आष्टी,जि.बीड या शाळेच्या बारा विद्यार्थीनीं उत्कृष्ट गुणांसह पात्र ठरल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,शाळेने या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसह एन.एम.एम.एस. परीक्षेमध्येही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.आचल संजय गुजर,प्रियंका विजयकुमार तवले,श्रावणी संतोष सुरवसे,तनिष्का प्रदीप धोंडे,वैष्णवी गोरख हंबर्डे,आदिती रवि पटेल,रिध्दी भगवान टाक या सात विद्यार्थीनींनी इ.५वी शिष्यवृत्तीमध्ये तर अनुष्का अविनाश मेहेर,प्रिती बिभीषण टाफरे,साक्षी आदिनाथ दळवी,समृध्दी सतीश दळवी,शिवदया राजकुमार पवार या पाच विद्यार्थीनींना इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थीनींचे अनेकांनी कौतुक केले.
शाळेमध्ये शालेय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विशेष तासिकांसह मार्गदर्शन तसेच परीक्षा परिषदेच्या मागील प्रश्रपत्रिका आणि वेगवेगळ्या प्रकाशनांचे सराव प्रश्नपत्रिका संच सोडवून घेतले जातात.शालेय स्पर्धा परीक्षा,शैक्षणिक सहल,क्रिडा स्पर्धा, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा यशस्वी वाटचाल करत आहे.

हेही वाचा:सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्तक्षेपाने बालविवाह टळला

सर् यशस विद्यार्थीनीं,त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक देवीदास शिंदे,सतिश दळवी,शरद राऊत,दत्तात्रय गाडेकर,राजेंद्र लाड,श्रीम.शिंदे ए.आर.श्रीम.खेत्रे एस.एस.,श्रीम. भापकर बी.व्ही.,श्रीम.तरटे एल.बी.,आणि शाळेतील सर्व आदर्श प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक या सर्वांचे,जेष्ठ शिक्षणविस्तारअधिकारी अर्जुन गुंड,केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे,आष्टी नं.१ केंद्राचे मुख्याध्यापक तथा माजी चेअरमन सुरेश पवार,तत्कालीन मुख्याध्यापक अरुण भापकर,मुख्याध्यापक आबासाहेब खताळ,आष्टी नगरपंचायतचे नगराध्यक्ष भारत मुरकुटे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डाँ.शेख रिजवाना,लक्ष्मणराव रेडेकर व सर्व सदस्य,पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close