ताज्या घडामोडी

*बीड जिल्ह्यात ५९ कैद्यासह पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी कोरोना  बाधित;१२८ कोरोना  बाधितांची भर*

शेअर करा

 

बीड दि २४ प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बीड मधील जिल्हा कारागृहातील ५९ कैदी कोरोना बाधित आढळून आले आहेत . तसेच गेवराई पोलीस ठाण्यातील कर्मचारी, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील दोघांचा समावेश असून १२८ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यातील कोरोना चा आकडा वाढत आहे. याची साखळी तुटण्यास तयार नसून उलट वाढत आहे. प्रशासन बाधित शोधून उपचार करण्यावर भर देत असूनही नवीन बाधित होत आहेत. जिल्ह्यातून अंबाजोगाई येथील कोविड  प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या एकूण स्वब पैकी १२८ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये गेवराई पोलीस ठाण्यातील कर्मचारी, बीड मधील ५९ जिल्हा कारागृहातील कैदी , स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील दोघांचा यामध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात बीड जिल्ह्यात आढळलेल्या बाधितांपैकी सर्वाधिक ७६ बीड जिल्ह्यातील आहेत.त्याखालोखाल परळी १७, अंबेजोगाई ०८, आष्टी ०८, गेवराई ०६, केज ०४ , धारूर ०३ , वडवणी ०३, माजलगाव ०२, पाटोदा ०१ यांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील ८३ रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९५४ इतकी झाली असून उपचार घेत असल्याल्यांची संख्या १८०८ इतकी झाली आहे. आजपर्यंत २१३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close