*बीड जिल्ह्यात 13 नवीन कोरोना बाधितांची भर;बीड@29*


बीड दि 21 मे टीम सीएम न्यूज
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या वाढतेय .दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे .काल पाठविलेल्या अहवालातील 13 पॉझिटिव्ह अहवाल आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले .यातील 11 बाधित हे नित्रूड ता.माजलगाव येथील आहेत तर एक सुर्डी ता. माजलगाव येथील असून तो कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती आहे .तर एक बाधित कुंडी ता.धारूर येथील आहे .
बीड जिल्ह्यातून लातूर येथे तपासणी साठी 113 स्वब पाठविण्यात आले होते .त्यापैकी काल चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते,त्यातील 13 अहवाल प्रलंबित होते .ते अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या 29
गेवराई-२
माजलगाव-३
बीड -५
केज-२
वडवणी -१
पाटोदा – ३
सुर्डी ता. माजलगाव 1
कुंडी ता.धारूर 1
नित्रूड ता.माजलगाव 11
एकूण 29
One Comment