क्राईमताज्या घडामोडी

*अहमदनगर शहरात गुटखा विक्रेत्यावर छापा; १४ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह एक जण अटकेत*

शेअर करा

 

 

अहमदनगर दि.१६ ,प्रतिनिधी

Advertisement

अहमदनगर शहरातील शेरकर गल्लीमध्ये अवैधरीत्या बंदी असलेला गुटखा बाळगून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच  त्यांनी या घरावर छापा टाकून १३ लाख ९२ हजार ७२९ रुपयाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केली आहे.या व्यक्ती विरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शेरकर गल्लीमध्ये शुभम रमणलाल भळगट यांचे राहते घरी विना परवाना बेकायदा गुटखा विक्री होत आहे.अशी बातमी मिळताच पोलीस उप निरीक्षक एस.एच. सुर्यवंशी यांनी ही खबर प्रभारी पोलीस अधीक्षक प्रभारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर डॉ.दत्ताराम राठोड यांचे कानी घालुन आदेशान्वये पोलीस उप निरीक्षक सुर्यवंशी व त्यांचे पथकातील कर्मचारी तसेच इतर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी या  ठिकाणी छापा घातला असता मिळालेल्या माहितीनुसार शुभम रमणलाल भळगट, वय २४ वर्षे रा. शेरकर गल्ली, अहमदनगर हा राहते घरी व दुपार नंतर त्याला विश्वासात घेवुन त्याचे गोडाऊन तपासले असता गोडाऊन मध्ये येवुन स्वतः खात्री करुन रात्री उशीरा दिनांक १६/१०/२०२० रोजी ०५.२६ वाजता प्रतिबंधीत असलेला गुटखा विना परवाना कब्जात बाळगताना आढळून आला.

 

या साठयामध्ये हिरापान मसाला, सुगंधी तंबाखु, गोवा १०००, अशा प्रतिबंधीत वस्तुची ७००५ लहान मोठी पाकिटे किंमत रुपये १३ लाख ९२ हजार ७२९ रुपये आहेत. हिरापानमसाला, ७१७ तंबाखु, सुगंधी तंबाखु, विना लेबल प्लॉस्टोक १/२ किलो सीलबंद पॉकेट, विमल पानमसाला, तुलसी जाफरानी जर्दा, रजनीगंधा पानमसाला, सुप्रीम पानपराग, नजर गुटखा, बाबा १६०,आर.एम.डी पानमसाला, एम.सेंटेड तंबाखु, व्ही. वन तंबाखु, राजेश्री पानमसाला इत्यादी होते. अन्न व औषधे प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी तोफखाना पोलीस ठाणे येथे खबर दिली असुन तोफखाना पो.स्टे. गु.र.नं. ७४७५/२०२० भादवि कलम १८८, २७२, २७३, ३२८, सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६(२)(आय.व्ही.) कलम २७ (३) (डी.), कलम २७ (३) (६), व कलम ३०(२) (ए), कलम ३ (१) (२२) (आय) व कलम ३ (१) (२२)(व्ही.) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ही वरिष्ठांचे आदेशाने विशेष पथकाचे पोलीस उप निरीक्षक एस.एच. सुर्यवंशी व पथकातील कर्मचारी आणि इतर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी केलेली आहे.

हेही वाचा :बीड जिल्ह्यात आज कुठे किती वाढले कोरोना बाधित रुग्ण!*

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: