ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात १६ जण कोरोना पॉझिटिव्ह;अहमदनगर मधील एकाचा समावेश

शेअर करा

इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात १६ जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि.२६ डिसेंबर, प्रतिनिधी

इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशील असा: आज पर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली.
यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत.
( त्यात नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १) अशी संख्या आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत.
बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.

हेही वाचा:आणि समृद्धी वाघिणीने दिला 5 बछड्यांना जन्म;आतापर्यंत 12

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close