आरोग्यताज्या घडामोडी

Corona fight *कोरोना लढ्यासाठी युवकांची सामाजिक बांधिलकी , किराणा घरपोच करणार*

शेअर करा

 

आष्टी दि 24 मार्च टीम सीएमन्यूज

कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विविध उपाययोजना करून नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन केले जात आहे.अशा स्थितीत नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बाहेर पडण्याची आवश्यकता नाही कारण आष्टीतील युवकांनी लोकांनी बाहेर पडू नये म्हणून ,थेट त्यांना, त्यांच्या किराणा दुकानातून घरपोच किराणा आणि भाजीपाला
पाठविण्यासाठी व्यवस्था केली आहे.
याबाबत सचिन रानडे यांनी सांगितले की, “नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये आणि त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी अडचण येऊ नये यासाठी आम्ही दोन गटात युवकांनी मदत करायचे ठरविले. एक गट किराणा माल नागरिकांच्या घरी पोहच करील तर दुसरा गट भाजीपाला पोहच करेल.यामुळे लोक घराबाहेर पडणार नाही.”
त्यासाठी त्यांनी नागरिकांना थेट आवाहन केलंय.
“आष्टीकरांनो घराबाहेर पडू नका….
जे हवय ते सांगा,घरपोहोच मिळेल….
छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाचे सदस्य आपल्या सेवेत…..
आष्टी शहर व मुर्शदपुरकरांसाठी
ज्यांना किराणा हवाय त्यांनी एकच करा…
आपले खाते ज्या किराणा दुकानदाराकडे आहे,त्याला आपल्या किराणा मालाची यादी व्हाट्सअॕपवर अथवा फोनवरून सांगा.तो किराणा माल आम्ही आपल्याला घरपोहोच करुत…ज्याचे खाते नाही अशांनी आमच्याशी संपर्क साधा,मालाची यादी सांगा ती देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोच केल्यानंतर त्यांचे पैसे द्या…जेणेकरुन आष्टी शहरात गर्दीचे प्रमाण वाढणार नाही.दिवसभर शांतता राहिली तर हा कोरोना विषाणू शहरात पसरणार नाही.
यासाठी खालील क्रमांकाशी संपर्क साधावा असे आव्हान या तरुणांनी केले आहे यामध्ये आष्टी नगरपंचायत चे सुनिल रेडेकर, सचिन रानडे, पिंकू बळे, दुर्गेश कुलकर्णी, अशपाक आतार, प्रीतम बोगावत, बब्बू शेख, राहुल शिंगवी हे तरुण सरसावले आहेत यासाठी या सर्वांनी त्यांची खालील प्रमाणे संपर्क क्रमांक दिले आहेत सदर सुविधा सायंकाळी 5 ते 7 या वेळेत देण्यात येणार आहे.

सुनील रेडेकर 9423172665,

सचिन रानडे 8830396300,

पिंकू बळे 7972917791
दुर्गेश कुलकर्णी 9422733131,

अश्पाकआतार 9822238451,

प्रितम बोगावत 9422740799,

बब्बू शेख 8007561561

राहूल शिंगवी, 9766679888

आष्टीच्या या तरुणांनी हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमांचे आष्टी शहरातून कौतुक होत आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: