शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह येऊ लागले;जिल्ह्यात 18 शिक्षक पॉझिटीव्ह
शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह येऊ लागले;जिल्ह्यात 18 शिक्षक पॉझिटीव्ह
बीड दि 23 जानेवारी ,प्रतिनिधी
उच्च प्राथमिक वर्ग सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत.त्यासाठी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या प्रशासनाने सुरू केल्या आहेत.जिल्ह्यात 18 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून बीड जिल्ह्यातील कोरोना चा आकडा कमी जास्त होताना दिसत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 38 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक शिरूर तालुक्यातील आहेत.
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या कमी होत असताना आता काही दिवसांवर इयत्ता 5 ते 8 वीच्या शाळा सुरू होतायत.त्यासाठी त्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.त्यानुसार शिक्षण विभागाने आणि जिल्हा परिषदेने नियोजन करून शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना चाचण्यांचे नियोजन केले आहे .
जिल्ह्यातील 11 तालुक्यात आता शिक्षकांचे कोरोना पॉझिटीव्ह अहवाल येऊ लागले आहेत .आतापर्यंत 882 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.त्यामध्ये 18 शिक्षक पॉझिटीव्ह आढळून आले आहेत .त्यामध्ये सर्वाधिक संख्या शिरूर कासार तालुक्यातील 11 शिक्षकांची आहे.अंबेजोगाई तालुक्यात 1,बीड तालुक्यात 4 आणि परळी तालुक्यात 2 शिक्षकांचा समावेश आहे.तर 152 अहवाल प्रलंबित आहेत.
यामध्ये 676 आर टी पी सी आर आणि 206 अँटीजन चाचण्यांचा समावेश आहे.