ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात 20 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह;आष्टी शहरातील एकाचा समावेश*

जिल्ह्याचा कोरोना आकडा वाढतोय

शेअर करा

 

बीड दि 11 जुलै टीम सीएम न्यूज

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 20 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोना पासून दूर असलेल्या आष्टी शहरातील एका व्यक्तीच्या समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील २९३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासण्यासाठी अंबेजोगाई येथील कोविड 19 प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 20 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर उर्वरित २७३ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बीडमधील ८व्यक्ती कोरोना बाधित

कोरोना बाधित आलेल्या व्यक्तींमध्ये बीड शहरातील आणि तालुक्यातील ০८ व्यक्तींचा समावेश आहे. रा.संत तुकाराम नगर मधील ५० वर्षीय पुरुष,तुळजाई नगर भागातील पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील ३० वर्षीय पुरुष, घुमरे कॉम्प्लेक्स मधील पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील ९ वर्षीय पुरुष, परवाना नगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील ५५ बर्षीय महिला,परवाना नगर भागातील पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील ३२ वर्षीय महिला, अश्विनी लॉज जवळ,शाहुनगर रोड येथील पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील २४ वर्षीय पुरुष,अश्विनी लॉज जवळ,शाहुनगर रोड,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील २५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील चौसाळा येथील ४३ वर्षीय पूरुष यांचा समावेश आहे.

परळीतील ४व्यक्ती कोरोना बाधित

परळी मध्ये ४ कोरोना बाधित आढळून आले आहेत त्यामध्ये रा.विद्या नगर, परळी, एसबीआय बॅक येथील पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासातील ६२ वर्षीय महिला,नाश्रा,एसबीआय बॅक येथील पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासातील ४६ वर्षीय पुरुष ,सिध्दार्थ नगर, परळी ३५ वर्षीय महिला, रा.गुरुकृपा नगर,नाथचित्र मंदीर समोर, परळी ४८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळुन आले आहेत.

गेवराई तालुक्यातील ६ व्यक्ती कोरोना बाधित

गेवराई तालुक्यातील सहा व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत.त्यामध्ये रा.संजयनगर, गेवराई, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील २५ वर्षीय पुरुष,ईस्लामपुरा गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासातील ३८ वर्षीय महिला,ईस्लामपुरा ,गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासातील १४ वर्षीय मुलगी
ईस्लामपुरा, २२वर्षीय महिला गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासातील ,मोमीनपुरा गेवराई ४७ वर्षीय पुरुप,रा.मोमीनपुरा गेवराई ६० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

आष्टी आणि धारूर मध्ये एक व्यक्ती कोरोना बाधित

आष्टी शहरात एक कोरोना बाधित आढळुन आला आहे .तो दत्तमंदीर गल्ली आष्टी येथील ४४वर्षीय पुरुष असून तो गुलबर्गा येथुन आलेला आहे . धारुर येथील एक ४२ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला असून तो साठेनगर धारुर येथील रहिवासी आहे.तो पुणे येथून आलेला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close