आरोग्यताज्या घडामोडी

*अहमदनगर जिल्ह्यात नव्या २६ रुग्णांची भर;अक्टिव्ह रुग्ण८२*

दिवसभरात 26 वाढ

शेअर करा

 

अहमदनगर दि 25 टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यात आज ०६ रुग्णांना डिस्चार्ज तर २६ नवे रुग्ण वाढले असून यामध्ये
खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या ५ रुग्णांचाही समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन आज घरी परतले. यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गतुन बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर आज जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या ५ रुग्णांची भर या रुग्ण संख्येत पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ८२ झाली आहे
सकाळी जिल्ह्यात १२ रुग्ण बाधित आढळून आले तर सायंकाळी यामध्ये आणखी ९ रुग्णांची भर पडली.
याशिवाय, राजेवाडी (जामखेड) येथील युवक दिल्ली येथे, नव नागापूर येथील व्यक्ती पुणे येथे आणि संगमनेर येथील व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आल्या होत्या. त्या व्यक्ती तेथेच उपचार घेत आहेत. तसेच सारसनगर येथील एक व्यक्ती मुंबई येथे बाधित आढळून आली होती. आज आणखी एका रुग्णाचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव आला. या व्यक्तींची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर आपल्या जिल्ह्यात नोंदवण्यात आली आहे त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

*जिल्ह्यातील एकूण बरे झालेले रुग्ण: २६०*
*जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या: ८२*
*एकूण नोंद रुग्ण संख्या: ३५४*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close