ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३७९ रुग्णांना डिस्चार्ज तर २६३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

शेअर करा

३७९ रुग्णांना डिस्चार्ज तर २६३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर दि 1 डिसेंबर,प्रतिनिधी

जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार २४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४९४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१ आणि अँटीजेन चाचणीत १६१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, जामखेड ०१, कोपर गाव ०१, नगर ग्रामीण ०५, पारनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, अकोले ०६, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०३, पारनेर ०४, पाथर्डी ०२, राहाता ०३, राहुरी ०३, संगमनेर ०४, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१, कँटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०७, अकोले ०७, जामखेड ०७, कर्जत ०५, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०६, पारनेर ०७, पाथर्डी १७, राहाता ०४, राहुरी १०, संगमनेर ३३, शेवगाव ०७, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा:बिबट्याला जेरबंद करणे,बेशुद्ध करणे अथवा ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची आ.सुरेश धस यांची मागणी

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ३३, अकोले ३१, जामखेड १३, कर्जत १५, कोपरगाव १७, नगर ग्रा.०४, नेवासा ३०, पारनेर २७, पाथर्डी ३५, राहाता २९, राहुरी २०, संगमनेर ६९, शेवगाव १९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट ०७ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:६१२४४*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १४९४*

*मृत्यू:९३४*

*एकूण रूग्ण संख्या:६३६७२*

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close