fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*२९० बाधितांची रुग्णसंख्येत भर;१७० रुग्णांना डिस्चार्ज*

शेअर करा

 

अहमदनगर दि 20 ,प्रतिनिधी

Advertisement

जिल्ह्यात २९० बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली असून सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ३७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४२७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८७ आणि अँटीजेन चाचणीत १६७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले ०३, कर्जत ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०१, संगमनेर ०२, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा:शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात शिक्षण विभागाने काढला पर्याय

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, अकोले ०९, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०३, पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहाता १४, राहुरी ०८, संगमनेर ०७,, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, अकोले १९, जामखेड ०४, कर्जत ४, कोपरगाव १६, नगर ग्रामीण ०२, नेवासा १४, पारनेर ०६, पाथर्डी २३, राहाता १६, राहुरी ०१, संगमनेर ३३, शेवगाव १० श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ३६ अकोले ३७, जामखेड ०८, कर्जत ०४, कोपरगाव ०५ नगर ग्रा.०९, नेवासा ०४ पारनेर ०२, पाथर्डी २ २,, राहाता ०९, राहुरी ०२, संगमनेर १९, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:५८३२७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १४२७*

*मृत्यू:९०१*

*एकूण रूग्ण संख्या:६०६५५*

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close