क्राईमताज्या घडामोडी

8 पिस्तूल बाळगणाऱ्या 3 व्यक्तीस अटक;शिरपूर पोलिसांची कारवाई

शेअर करा

8 पिस्तूल बाळगणाऱ्या 3 व्यक्तीस अटक;सांगवी पोलिसांची कारवाई

 

ऋषिकेश अहिरराव
धुळे दि 22 डिसेंबर

पंजाब मधून शस्त्र खरेदी करण्यासाठी आलेल्या 3 संशयित व्यक्तींना 8 पिस्तुलासह शिरपूर पोलिसांनी अटक केली.धुळे जिल्ह्यातील सीमा भागातील सांगवी ते वरला गावाजवळ तपासणी करताना त्यांच्याकडे अनधिकृत 8 पिस्तूल आढळून आले.

पंजाब राज्यातून काही संशयित हे शस्त्र खरेदी करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सिमेलगतच्या भागात आले असल्याची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. पाटील यांनी तात्काळ आपल्या पथकातील नरेंद्र खैरनार, राजू सोनवणे, चत्तरसिंग खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी, संभाजी वळवी यांच्या पथकाने पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास शोध घेण्यास सुरवात केली.
या पोलीस पथकाने महाराष्ट्र मधप्रदेश सिमाभागातील सांगवी ते वरला गावाजवळ खंबाळे रोडवर गस्ती दरम्यान तपासणी करीत असतांना चार वाजेच्या सुमारास जोयदा गावापासून वरलागावाच्या बाजुकडे काही अंतरावर एक पंजाब पासिंगची एक कार येतांना दिसली. त्या कारची तपासणी केली असतात त्या कार मधून
8 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतूसे यांच्यासह 15 या हजार रोख रक्कमसह अंदाजे एकूण 5 लाख 32 हजाराचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे. या तिनही संशयितांना अटक करण्यात आली ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव ,उपविभागीय पोलीस अधिकारी
अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

हेही वाचा:वाशिम मधील हजारो नागरिक बनले ऐतिहासिक खगोलीय घटनेचे साक्षीदार

 

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close