आरोग्यताज्या घडामोडी

आज ३१५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २१६१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

शेअर करा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.८६ टक्के

अहमदनगर
जिल्ह्यात आज ३१५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार ३४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१६१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९ हजार ०३९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २६८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६९४ आणि अँटीजेन चाचणीत ११९९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, जामखेड ०२, कर्जत ३१, कोपरगाव ७३, नगर ग्रामीण ४१, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहता ०४, राहुरी ५०, संगमनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७६, अकोले १५, जामखेड ७१, कर्जत १०, कोपरगाव ०४, नगर ग्रा.३२, नेवासा १२५, पारनेर २५, पाथर्डी ५८, राहाता ३०, राहुरी ०५, संगमनेर ५४, शेवगाव ६६, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ७७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा ३१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ११९९ जण बाधित आढळुन आले. मनपा ३०, अकोले ९५, जामखेड १२, कर्जत ९३, कोपरगाव ५२, नगर ग्रा. ५८, नेवासा १७०, पारनेर १३७, पाथर्डी १२१, राहाता ६४, राहुरी १०६, संगमनेर ५९, शेवगाव ४६, श्रीगोंदा ८१, श्रीरामपूर ६४ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा १८७, अकोले २७६, जामखेड १२९, कर्जत २२५, कोपरगाव १३५, नगर ग्रामीण २३१, नेवासा २०८, पारनेर २४३, पाथर्डी २६९, राहाता १५४, राहुरी १९३, संगमनेर ३६०, शेवगाव १६७, श्रीगोंदा ११२, श्रीरामपूर १८२, कॅन्टोन्मेंट ३४, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ४९ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:२,१४,३४६

उपचार सुरू असलेले रूग्ण:१९०३९

मृत्यू:२५१६

एकूण रूग्ण संख्या:२,३५,९०१

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close