fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यातील एकाच गावात तब्बल 32 कोरोना बाधित ;आष्टी पाटोदा निरंक*

शेअर करा

 

बीड दि 21,प्रतिनिधी

Advertisement

एकाच गावात तब्बल 32 कोरोना बाधित आढळून आले. माजलगाव तालुक्यातील माळवाडी सुल्तानपूर येथे हे बाधित आढळून आले असून जिल्ह्यातील आष्टी पाटोदा येथील कोरोना आकडेवारी आज निरंक आहे.
आज आलेल्या अहवालामध्ये 72 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही माजलगाव तालुक्यातील असून त्याखालोखाल बीड मधील आहेत.

आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 72 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.आष्टी आणि पाटोदा तालुक्यात आज एकही कोरोना बाधित आढळून आला नाही.मात्र माजलगाव तालुक्यातील माळवाडी सुल्तानपूर या गावात हे बाधित आढळून आले

जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई 05,आष्टी 00 बीड 19, धारूर 00,गेवराई 03,केज 06,माजलगाव 32, परळी 04,पाटोदा 00,शिरूर 02,वडवणी 02 एकूण 72 जणांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यातील एकूण 1896 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 1824 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.पैकी 72 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

हेही वाचा:राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close