ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*नगर जिल्ह्यात 33 कोरोना बाधित ;संगमनेर सर्वाधिक*

शेअर करा

 

 

अहमदनगर दि 4 जुलै टीमसीएम न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 33 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यातील 13 हे संगमनेर तालुक्यातील असून नगर शहरातील 8 चा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील ०५ जण, कुंभारवाडी (ता. पारनेर) गावातील एक जण आणि अशोकनगर,श्रीरामपूर येथील 1 कोपरगांव २,अकोले २,आष्टी, बीड १असे मिळून 33 बाधित आले आहेत.
*संगमनेर १३*
कुरण येथील ३० वर्षीय पुरुष, २३ वर्षीय युवक, ६६ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, १२ वर्षीय मुलगा, २३ वर्षीय युवक, १४ वर्षीय मुलगा, ११ वर्षीय मुलगा, संगमनेर विठ्ठलवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष, श्रमीक नगर येथील ५७ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, रहेमतनगर येथील ४३ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथील ३९ वर्षीय पुरुष
संगमनेर येथील या १३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
*नगरशहर ८*
नगर शहरातील ६२ वर्षीय महीला व ३६ वर्षीय पुरुष, चितळेरोड येथील ५३ वर्षीय महीला, गवळीवाडा येथील ४० वर्षीय पुरुष, ढवणवस्ती येथील २९ वर्षीय महीला व १३ वर्षीय मुलगा, पाईपलाईन हडको येथील २६ वर्षीय महीला व ४ वर्षाचा मुलगा.नगर शहरातील या ८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
*कोपरगांव २*
कारंजा चौक, येसगांव येथील ३५ वर्षीय महीला व धरणगांव येथील १९ वर्षीय युवक या दोन व्यक्ती कोरोना बाधीत.
*अकोले २*
अकोले येथील ३० वर्षीय पुरुष व २५ वर्षीय युवक या दोन व्यक्ती कोरोना बाधीत.
*आष्टी, बीड १*
कारखेल ता. आष्टी जि. बीड येथील ३५ वर्षीय पुरुष कोरोना बाधीत.
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील ०५ जण, कुंभारवाडी (ता. पारनेर) गावातील एक जण आणि अशोकनगर,श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close