fbpx
Top-न्यूजताज्या घडामोडीशैक्षणिक

35 शिक्षक कोरोना बाधित ;शिक्षकांचा बाधित होण्याचा आकडा वाढतोय!

शेअर करा

 

बीड दि 22,प्रतिनिधी

35 माध्यमिक शिक्षक आज कोरोना बाधित आढळून आले आहेत .काल 20 आढळून आल्यानंतर त्यामध्ये आणखी 15 शिक्षकांची भर पडली आहे .

23 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या माध्यमिक शाळांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरुना चाचण्या सुरू आहेत यामध्ये आज पस्तीस शिक्षक कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे.

23 नोव्हेंबर पासून राज्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचे धोरण सरकारने घेतले आहे त्यानुसार स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय ढकलून देण्यात आला.
त्यासाठी 9 ते बारावीला शिकवणाऱ्या सर्व माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होणे अत्यावश्यक आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून त्यांच्या पूर्ण चाचण्या सुरू असून 35 शिक्षक हे कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

यामध्ये आंबेजोगाई येथील आठ, आष्टी येथील दोन, बीड येथील सहा,धारूर येथील एक, गेवराई तालुक्यातील सात,केज तालुक्यातील दोन ,माजलगाव तालुक्यातील एक, परळी तालुक्यातील चार,पाटोदा तालुक्यातील एक, शिरूर कासार तालुक्‍यातील तीन एकूण 35 शिक्षकांचा समावेश आहे.तर वडवणी तालुक्यात एकही शिक्षक कोरोना बाधित नसल्याचे आज आलेल्या अहवालामध्ये आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार 596 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 1120 त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

हेही वाचा:राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close