ताज्या घडामोडी

*४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज;नवीन ७७ कोरोना बाधित*

शेअर करा

 

अहमदनगर दि 23 प्रतिनिधी

जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८८१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर ०१, अकोले ०१, जामखेड ०५ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४२४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर २९, राहाता ०९, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३७, श्रीरामपूर १२, कॅन्टोन्मेंट १४, नेवासा १३, श्रीगोंदा १९, पारनेर ३०, राहुरी ०७, शेवगाव १२, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: १३४७८*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२८८१*

*मृत्यू: २२६*

*एकूण रूग्ण संख्या:१६५८५*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close