ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात सकाळपासून 50 बस धावल्या रस्त्यावर*

शेअर करा

 

बीड दि 22 मे टीम सीएमन्यूज

राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या नवीन लॉकडाऊनसंबंधीच्या नियमानुसार बीड जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत बससेवा आज पासून सुरू करण्यात आली. आठ तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या 50 बस रस्त्यावर धावल्या.पाटोदा येथे जाणाऱ्या बस रेड झोन असल्याने जाऊ शकल्या नाहीत .अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी हर्षद बनसोडे यांनी दिली .

अधिक वाचा

*सार्स कोरोना-2 विषाणू संक्रमण कल चाचणीसाठी आयसीएमआर तर्फे बीड जिल्ह्यातील आठ गावे आणि दोन शहरांची निवड*

*सार्स कोरोना-2 विषाणू संक्रमण कल चाचणीसाठी आयसीएमआर तर्फे बीड जिल्ह्यातील आठ गावे आणि दोन शहरांची निवड*

बीड जिल्हा अंतर्गत एसटी बस सेवा आज सुरू झाली .बीड येथून 8 तालुक्याच्या ठिकाणी एसटी बस पाठविण्यात आल्या .या संदर्भात जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यापैकी बीड 9, परळी 4, धारूर 7, माजलगाव 12, गेवराई 8, आष्टी 6, अंबेजोगाई 4 अशा एकूण 50 बस सोडण्यात आल्या आहेत .आष्टी येथे जाण्यासाठी जामखेड मार्गे एसटी धावत होती.मात्र जामखेड हे अहमदनगर जिल्ह्यात येत असल्याने या बसचा मार्ग बदलण्यात आला असून त्या अंमळनेर- डोईठाण मार्गे आष्टीला जाणार आहे .अशी महिती बनसोडे यांनी दिली .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close