ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अँटीजेन चाचणीत पाथर्डी तालुक्यात 55 बाधित*

शेअर करा

 

पाथर्डी दि 7 ,प्रतिनिधी

आज कोरोना चाचणीत 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.सायंकाळी शहर आणि तालुक्यातील 55 व्यक्ती कोरोनाने बाधित झाले आहे.
आतापर्यंत एका दिवसात सर्वधिक कोरोनाचे रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,कोव्हीड सेंटरचे प्रमुख डॉ महेंद्र बांगर, डॉ बाप्पूराव डोंगर,डॉ सुरज गावडे, डॉ अक्षय परदेशी,डॉ प्रदीप डमाळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रल्हाद बडे, संजय नरवडे यांच्या पथकाने 181 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली.त्यात 55 व्यक्ती कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा:अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ५५९ रुग्णांची नोंद आज ३६८ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

पाथर्डी शहर 01,कसबा 02,मेनरोड 02,भंडार गल्ली 02,कोल्हार 03,आखरभाग 02,नाथनगर 02,एडके कॉलनी 02,शिवशक्तीनगर 04,साईनाथनगर 08,शिक्षक कॉलनी 01,सावतानगर 01,ढाकणवाडी 04,जवखेडे 01,धारवाडी 02,टेंभुर्णी 04 (बीड),तिसगाव 01,शिरापूर 08,किर्तनवाडी 01,मालेवाडी 01,खरवंडी कासार 01,टाकळी मानून 01,डमाळवाडी 01 भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

31 जुलै ते 7 ऑगस्ट या आठ दिवसात सुमारे 275 कोरोनाने बाधित झालेले रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close