ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमराठवाडा

*बीड जिल्ह्यात आणखी 6 कोरोना बाधित; जिल्ह्याचा आकडा वाढला@47*

शेअर करा

 

बीड दि 24 मे टीम सीएमन्यूज

बीड जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे.आज आलेल्या अहवालात 6 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .
लातूर येथील प्रयोगशाळेला 40 स्वब पाठविण्यात आले होते त्यापैकी 33 स्वब निगेटीव्ह आणि 6 स्वब पॉझिटिव्ह आले असून एक स्वब संदिग्ध असून परत पाठविण्यात येणार आहे .

जिल्ह्यात कोरोना मीटर वाढत आहे कालपर्यंत ही संख्या 41 इतकी होती .त्यातील एक बरा होऊन घरी गेला असून एकाचा मृत्यू झाला आहे .39 पैकी 6 पुणे येथे पाठविण्यात आले असून यांच्या वर उपचार सुरू आहेत .आज आणखी 6 ची भर पडल्याने ही संख्या 47 इतकी झाली आहे .
दिवसेंदिवस कोरोनाचे वाढणारे आकडे जिल्हा प्रशासनाला डोकेदुखी होत आहे .

पॉझिटिव्ह आलेले हे बाधित
3 – साखरे बोरगाव ता बीड येथील 3 असून हे सर्व मुंबईहून आलेले आहेत त्यामध्ये एक पुरुष वय 48, एक महिला 35, एक मुलगी 13 यांचा समावेश आहेत तर उर्वरित तीन मध्ये एक पाटोदा शहर पुरुष वय 40 असून हा ही मुंबईहुन आलेला आहे.तर वडवणी येथे मुंबईहून आलेले दोघे पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत .यामध्ये एक पुरुष वय 36 आणि एक महिला 30 आहेत.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: