ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

*नगर जिल्हयात 6 नवीन बाधित;६०ऍक्टिव्ह केसेस*@२३२*

शेअर करा

 

अहमदनगर दि 10 जून ,टीमसीएम न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात आज सहा नवीन बाधित रुग्णांची भर पडली.आज जिल्ह्यात 60 ऍक्टिव्ह रुग्ण असुन जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २३२ इतकी झाली आहे अशी माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली .
आज जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब मध्ये सकाळी एक व्यकी पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच संगमनेर येथील ०४ रुग्ण आणि नगर शहरातील कायनेटिक चौक येथील एक रुग्ण खाजगी प्रयोगशाळेने केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात संगमनेर येथील चार पैकी एक जण निमोन येथील आहे. नगर शहरात पॉझिटिव्ह आढळून आलेली महिला ही एका खाजगी रुग्णालयात काम करते.त्यांचाही समावेश जिल्हा रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एकूण बधितांपैकी १६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ११

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: