ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात 6 पॉझिटिव्ह;आष्टी तालुक्यातील 2*

शेअर करा

 

बीड दि 5 जुलै टीमसीएम न्यूज

आज बीड जिल्ह्यातील कोविड 19 लॅबमधून आलेल्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामध्ये आष्टी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
आज अंबेजोगाई च्या कोविड 19 प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज एकूण 248 तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी 239 अहवाल निगेटिव्ह आले .तर 3 अहवाल अनिर्णित आले असून त्याची प्रतीक्षा आहे.

जुना बाजार,बीड येथील 2 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 38वर्षीय महिला,11 वर्षीय मुलगा तर संत कबीर नगर,अंबाजोगाई येथील 40 वर्षीय महिला बाधित झाली असून ती अलिबाग येथून आलेली आहे.
आष्टी तालुक्यातील दोन बाधित असून त्यामध्ये सुरडी येथील 30 वर्षीय महिला बाधित आढळून आली ही महिला मुंबई येथून आलेली आहे.दुसरा बाधित हा गंगादेवी येथील 65 वर्षीय पुरुष आहे. परळी येथील 58 वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close