fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*7 ट्रॅप कॅमेरे 8 पिंजरे पाहताहेत नरभक्षक बिबट्याची वाट*

बिबट्याला शोधण्यासाठी तिसगाव वन विभागाची सर्च मोहीम

शेअर करा

 

 

तिसगाव दि 31 प्रतिनिधी

Advertisement

गेल्या आठ दिवसापासून तिसगाव पाथर्डी वन विभागाच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला शोधण्यासाठी तिसगाव वन विभागाने जोरात शोध मोहीम सुरू केली असून या परिसरात 7 ट्रॅप कॅमेरे 8 पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती तिसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघूलकर यांनी दिली.

शिरापूर येथील सार्थक संजय बुधवंत या 4 वर्षाच्या चिमुकल्याची दोन दिवसांपूर्वी बिबट्याने आईसमोर उचलून नेऊन हत्या केली.तसेच यापूर्वी केळवंडी आणि मढी येथील दोन बालकांचा या बिबट्याने जीव घेतला आहे.त्यामुळे हा बिबट्या नरभक्षक बनला आहे.
तिसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाऊन वन विभागाचे कर्मचारी जागृती करत आहेत.तसेच या भागात यापूर्वी 4 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून आणखी 5 ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत असल्याचे वाघूलकर यांनी सांगितले.

हेही वाचा:बिबट्याला ठार करा अथवा जेरबंद करा:आमदार मोनिका राजळे यांची मागणी

एक ट्रॅप कॅमेरा चोरीला
गर्भगिरी डोंगरात या बिबट्याला शोधण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा चोरीला गेला असल्याची फिर्याद वन विभागाच्या वतीने देण्यात आली असल्याची माहिती वाघूलकर यांनी दिली.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close