fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात 70 कोरोना बाधित, वडवणी पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांचा समावेश*

शेअर करा

बीड दि 29 ,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील कोरोना चा आकडा कमी जास्त होताना दिसत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 70 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत

Advertisement
. यामध्ये वडवणी येथील पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या कमी अधिक होत आहे. गेल्या चार दिवसापासून ही संख्या 100 च्या आत येत असून त्यामुळे हे एक चित्र बीड जिल्ह्यासाठी दिलासादायक असेच म्हणावे लागेल. कालच्या आकडेवारीपेक्षा आजची आकडेवारी कमी असल्याचे दिसत आहे.

परळी तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या आता अवघ्या दोन ते तीन वर येऊन ठेपली आहे. असेच चित्र बीड वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पहावयास मिळत आहे. बीड तालुक्यामध्ये येणारी बाधितांची संख्या ही दोन अंकी आकड्यातच येत असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये ही संख्या  70 इतकी आहे. आज बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोरोना  पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई  10 आष्टी 7,बीड 20 धारूर 1 गेवराई 7 केज 2,माजलगाव 7 परळी 3 पाटोदा 1 शिरूर 2 वडवणी 10 एकूण 70 जणांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यातील एकूण 753 व्यक्तींची  कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 683 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून जिल्ह्यातील तपासणीही कमी झाल्या आहेत.

आष्टी तालुक्यातील 7 बधितांमध्ये कडा जिजाऊ वसाहत येथील 2,कारखेल खुर्द येथील 3 सुरडी येथील 1 आणि केळसांगवी येथील एकाचा समावेश आहे.

हेही वाचा:बीड जिल्ह्यात कोरोना बधितांचा संख्या वाढली@89

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close