ताज्या घडामोडीमराठवाडा

*आज बीड जिल्ह्यात 74 बाधितांची भर;82 रुग्णांना डिस्चार्ज*

शेअर करा

 

बीड दि 16,प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 74 रुग्ण बाधित आढळून आले असून 82 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड मधील आहेत.आज आष्टी तालुक्यातील दोघांचा नगर मध्ये मृत्यू झाला .त्यांची अद्याप बीड च्या पोर्टल वर नोंद झाली नाही.

आज बीड जिल्ह्यातील 554 अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 497 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 74 बाधित आढळून आले असून एक अहवाल अनिर्णित आहे. बीड 26,अंबाजोगाई 5, गेवराई 1,केज 8,माजलगाव 9 परळी 9 पाटोदा 2, शिरूर 2, धारूर 5 , वडवणी 3 आणि आष्टी तालुक्यातील धानोरा येथील चौघांचा समावेश आहे .
बीड जिल्ह्यातील मृत्यु 60 आणि इतर जिल्ह्याच्या पोर्टल वर झालेली संख्या 6 अशी मिळून 66 झाली आहे.आतापर्यंत 2571 बाधित झाले असून 1114 बरे होऊन घरी परतले आहेत.अक्टिव्ह रुग्णांची संख्या 1393 झाली आहे.

 

*पाथर्डीत कारागृहातील 8 आरोपींसह 20 जण कोरोना बाधित*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close