ताज्या घडामोडी

*रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये बीड शहरात निघाले 86 पॉझिटिव्ह*

शेअर करा

 

बीड दि 8 प्रतिनिधी,
बीड शहरात भिलवाडा पॅटर्न ने शोध घेतलेल्या कोरोना टेस्ट मध्ये 86 व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत.दिवसभरात 2601 व्यक्तींची टेस्ट करण्यात आली.ही टेस्ट उद्या आणि परवा होणार आहे.

बीड शहरामध्ये आजपासून अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत त्यासाठी बीड शहर तीन दिवस बंद ठेवण्यात आले असून या तीन दिवसांत सुपर स्प्रेडर्स शोधण्यासाठी ही उपाययोजना केली जात आहे .

बीड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी,बीड यांच्या आदेशानुसार बीड शहरातील सर्व व्यवसायीक व कामगार वर्ग यांची अँटीजन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आलेले होते. सदर तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामध्ये १.बलभिम
महाविद्यालय,बीड २.मॉ वैष्णवीदेवी पॅलेस, एम. आय.डी.सी.रोड, बीड ३.जिल्हा परिषद ज्ञाळा,अशोक नगर, बीड. ४.राजस्थानी विद्यालय,विप्रनगर,बीड ५.चंपावती प्राथमिक शाळा,बुथ क्र. १ नगर रोड, बीड
६.चंपावती प्राथमिक शाळा,बुथ क्र.२ नगर रोड,वीड या ठिकाणांचा समावेश होता. सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, प्रयोगज्ञाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोमग्य सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ९४
कर्मचार्यांनी काम पाहिले.
बीड शहरातील ६ तपासणी केंद्राबर २६०१ व्यावसायिकांची कोबिड-१९ निदानासाठी अँटीजन तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये ८६ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळूल आले.लागण झालेल्या ८६ नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले. सदर लोकांची तपासणी व निदान
झाल्यामूळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यात मदत होणार आहे.

 

बीड शहरात एकाच दिवशी २६०१ लोकांची अँटीजन टेस्ट करण्याची विशेष मोहिमेला बीड शहरातील इ. सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी याकामी मोलाचे सहकार्य करुन उत्सफूर्त प्रतिसाद नोंदविला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close