आरोग्यताज्या घडामोडी

त्या ९ गावात कोंबड्याच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीस बंदी;संसर्गित क्षेत्र जाहीर  

शेअर करा

Table of Contents

बीड दि ११ जानेवारी/ प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मुगगाव येथे मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पाटोदा आणि आष्टी तालुक्यातील ९ गावांना संसर्गित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.या गावामध्ये कुक्कुट पक्षाची खरेदी विक्री आणि आवागमन करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील मुगगाव तालुका पाटोदा येथे ७ जानेवारी रोजी 11 कावळे मृत स्थितीत आढळून आले आहेत. त्यापैकी 3 कावळयांचे शव रोग निदानासाठी, रोग अन्वेषण विभाग, पुणे मार्फत NISHAD, भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. सदरील  नमुने बर्ड फ्लू (H5N8 ) पाझिटिव्ह आले आहेत. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले असून,तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

 

प्रतिबंध करण्यात आलेल्या गावांमध्ये पाटोदा तालुक्यातील अंतापूर, वाहली, चिखली, सुप्पा सावरगाव, निवडुंगा, भुरेवाडी जोगदंड, वसंतवाडी तसेच आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव, पांगुळगव्हाण इत्यादी गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून सदरील गावातील कुक्कुट पक्षांची खरेदीविक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

त्या ९ गावे संसर्गित क्षेत्र म्हणून घोषित

जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे. पोपट. बगळे, किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये मतुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यवसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाण्यास माहिती द्यावी. मृत पक्षास हात लावू नये, शव विच्छेदन करु नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये असे कळवण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने अंडी व कुक्कुट मांस किमान 70C तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षीत असल्याचे कळविले आहे.

हेही वाचा :मुगगावच्या त्या २२ कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू नेच 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close