fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात 98 कोरोना बाधित,धारूर मधील संख्या शून्य*

शेअर करा

बीड दि 31,प्रतिनिधी
आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 98 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.धारूर तालुक्यातील संख्या शून्यावर आली आहे. यामध्ये बीड  तालुक्यातील संख्या 32 म्हणजे सर्वाधिक आहे.

जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये ही संख्या  98 इतकी आहे. आज बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोरोना  पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई  9आष्टी 19 बीड 32 धारूर 00 गेवराई 7,केज 8,माजलगाव 10, परळी 9, पाटोदा 3,शिरूर 3,वडवणी 6 एकूण 98 जणांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यातील एकूण 899 व्यक्तींची  कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 801अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.पैकी 98 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून जिल्ह्यातील तपासणीही कमी झाल्या आहेत.

आष्टी तालुक्यातील 19 बधितांमध्ये कडा 2 ,अमोलक शाळेजवळ कडा 1,शिदेवाडी 4,टाकळसिंग 4 सोलेवाडी 2 हिंगणी 1,सुलेमान देवळा 1,कारखेल 1,दादेगाव 1, बीडसांगवी 1, लोणी 1 यांचा समावेश आहे.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close