Saturday, July 26, 2025

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य पुरस्‍कारांची घोषणा

लोणी,
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जयंती दिनाच्‍या निमित्‍ताने दरवर्षी देण्‍यात येणा-या साहित्‍य पुरस्‍कारांची घोषणा पुरस्‍कार निवड समितीने केली असून, यावर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍कार कोल्‍हापुर येथील डॉ.सुनिलकुमार लवटे यांना जाहिर झाला असून, राज्‍यस्तरीय उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍कार मुंबई येथील डॉ.मिनाक्षी पाटील तसेच राज्‍यस्‍तरीय उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍कार डॉ.एच व्‍ही देशपांडे यांना तर राज्‍यस्तरीय नाट्यसेवा पुरस्‍कार दिलीप जगताप आणि राज्‍यस्‍तरीय कलागौरव पुरस्‍कार अतांबर शिरढोणकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना देण्‍यात येणार असल्‍याची माहीती पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष जेष्‍ठ साहित्‍यीक डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिली.

   पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जयंती दिना निमित्‍त   सलग ३५ व्‍या वर्षी अखंडीतपणे साहित्‍य, नाट्य आणि कला क्षेत्रातील व्‍यक्तिंना पुरस्‍कार देवून गौरविण्‍यात येत आहे. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे हे वर्ष शतकोत्‍तर रोप्‍यमहोत्‍सवी जयंती वर्ष असून, दिनांक ८ ऑगस्‍ट २०२५ रोजी प्रवरानगर येथे या साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचे वितरण महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष मिलींद जोशी यांच्‍या प्रमुख उपस्थितीत करण्‍यात येणार असल्‍याची माहीती पुरस्‍कार निवड समितीचे निमंत्रक डॉ.राजेंद्र सलालकर यांनी दिली.

   डॉ.सुनिलकुमार लवटे यांना विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍काराने गौरविण्‍यात येणार असून, १ लाख रुपये रोख आणि स्‍मृतीचिन्‍ह असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. मराठी आणि हिंदी भाषेमध्‍येही त्‍यांनी विपूल लेखन केले असून, शिक्षण, अध्‍यापन, साहित्‍य, समिक्षा आणि संशोधन क्षेत्रात केलेल्‍या कार्याचा गौरव या पुरस्‍काराच्‍या   निमित्‍ताने करण्‍यात येणार आहे. डॉ.मिनाक्षी पाटील यांच्‍या उत्‍तर, आधुनिकता आणि मराठी कविता या संशोधन ग्रंथास ५१ हजार रुपये रोख आणि स्‍मृतीचिन्‍ह देवून सन्‍मानित करण्‍यात येणार असून, कवयत्री, चित्रकार आणि ललित लेखीका म्‍हणून साहित्‍य क्षेत्रात त्‍यांची ओळख आहे.

   डॉ.विखे पाटील राज्‍यस्‍तरीय विशेष साहित्‍य पुरस्‍कार एच.व्‍ही   देशपांडे यांच्‍या मराठी नवसमिक्षा उग्दम आणि विकास या संशोधन ग्रंथास देण्‍याचा निर्णय पुरस्‍कार निवड समितीने केला असून, २५ हजार रुपये रोख आणि स्‍मृतीचिन्‍ह असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. अहिल्‍यनगर जिल्‍हा साहित्य पुरस्‍कार संगमनेर येथील संतोष भालेराव यांच्‍या   लालाय्लू या कांदबरीस आणि अहिल्‍यानगर जिल्‍हा विशेष साहित्‍य   पुरस्‍कार संगमनेर येथील श्रीकांत कासट यांच्‍या दुर्ग वैभव या पुस्‍तकास देण्‍यात येणार आहे. प्रत्‍येकी १० हजार रुपये रोख आणि स्‍मृतीचिन्‍ह असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे.

   पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्‍तरीय नाट्यसेवा पुरस्‍कार सातारा येथील दिलीप जगताप यांना देण्‍यात येणार असून, २५ हजार रुपये रोख आणि स्‍मृतीचिन्‍ह देवून त्‍यांना गौरविण्‍यात येणार आहे. नाट्यक्षेत्रात विद्यार्थी दशेपासून योगदान देणा-या तसेच जवळपास चाळीस नाट्यसंहिता निर्माण करुन, मराठी रंगभूमीच्‍या इतिहासात समांतर रंगभूमीच्‍या समिक्षेला दिशादर्शक ठरतील अशा संहिता निर्मि‍त करण्‍यासाठी केलेल्‍या कार्याचा हा गौरव असल्‍याचे पुरस्‍कार निवड समितीने सांगितले.

   तमाशा कलावंत अतांबर शिरढोणकर (सांगली) व प्रसाद अंतरवेलीकर (निफाड) यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येणार असून, प्रत्‍येकी २५ हजार रुपये रोख आणि स्‍मृतीचिन्‍ह असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. या पुरस्‍कार निवड समितीमध्‍ये डॉ.एकनाथ पगार, डॉ.दिलीप धोंडगे आणि निमंत्रक डॉ.राजेंद्र सलालकर यांनी काम पाहीले.

पुरस्‍कार निवड समितीने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा परिसर पुरस्‍कार संदिप तपासे यांच्‍या काठावरची माणसं या कथा संग्रहाला रुपये ७ हजार रुपये रोख आणि स्‍मृतीचिन्‍ह, वयाच्‍या ८० वर्षांनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जीवनावर शोधनिबंध सादर करणारे आणि त्‍याचे सहकाराचा कल्‍पवृक्ष विठ्ठलराव विखे पाटील हे पुस्‍तक प्रकाशित करणारे डॉ.वसंतराव ठोंबरे यांनाही प्रत्‍येकी ११ हजार रुपये आणि स्‍मृतीचिन्‍ह देवून विशेष सत्‍कार करण्‍यात येणार असल्‍याचे समितीने सांगितले.

पुरस्‍कार जाहिर झालेल्‍या सर्व जेष्‍ठ साहित्‍यीक तसेच नाट्य आणि कलाक्षेत्रातील व्‍यक्‍तींचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍यासह प्रवरा परिवारातील सर्व संस्‍थांच्‍या पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles