अहिल्यानगर
maha state teacher award 2025 राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये एक माध्यमिक शिक्षक एक प्राथमिक शिक्षक आणि आदिवासी शिक्षक या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. प्राथमिक शिक्षक विभागात शितल मोहन झरेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव तालुका नेवासे, माध्यमिक शिक्षक विभागात विद्या रामभाऊ भडके शिवाजी हायस्कूल बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांना तर तिसरा पुरस्कार आदिवासी विभागातून अनिल सिताराम डगड शिळवंडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांना जाहीर झाला आहे.
येत्या 22 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये या राज्यशिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून राज्यातील 109 शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामध्ये प्राथमिक शिक्षक 38 माध्यमिक शिक्षक 39 आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक 19 आठ विभागातून थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8 विशेष कला क्रीडा दोन दिव्यांग शिक्षक एक स्काऊट गाईड दोन असे एकूण 109 पुरस्कार दिले जाणार आहेत.